लेख क्रमांक ३ संग्रहालयाची शिक्षणात भूमिका
लेख क्रमांक ३
संग्रहालयाची शिक्षणात भूमिका
संग्रहालय हि केवळ सामाजिक आणि शैक्षणिक संस्थाच आहे असे नाही तर संग्रहालय समाजाचे हृद्दय आहे संग्रहालयाचे इतर शैक्षणिक संस्था सोबत घनिष्ठ संबध नेहमीच असतात आणि सहकार्य नेहमीच असते संग्रहालय हे स्वतःच शिक्षण देणारी संस्था आहे संग्रहालय कलेचा इतिहास शिकविते संग्रहालयाच्या माध्यमातून शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते संयुक्त राष्ट्रामधील अनेक विद्यापीठात व शाळेत अनेक विषयावरील अनेक संग्रहालये आहेत रशिया आणि फ्रान्स याचे महत्व लक्षात आले संग्रहालयातील प्रदर्शित वस्तूची चित्र फीत तयार करून त्या द्वारा शिक्षण दिले जाते यामध्ये कला इतिहास मानववंशशास्त्र नैसर्गिक विज्ञान संग्रहालय शास्त्र इत्यादीचे शिक्षण दिले जाते
ग्रेट
ब्रिटन आणि न्यूझीलंड येथे शिक्षक आणि मुख्याध्यापक यांचे करिता संग्रहालये आहेत संग्रहालयास भेट कशी द्यावी काय पाहावे संग्रहालयाचा अभ्यास कसा करावा याचे पुस्तक जर्मनीने काढले आहे प्रथम प्रांतीय संग्रहालयाची स्थापना वॉशिंग्टन यथे करण्यात आली सन १९६५ साली
बाल संग्रहालयाची स्थापना स्वीडन येथे करण्यात आली तंत्र विषयक ज्ञान करिता बिर्ला इंडस्ट्रीयल आणि टेक्नोलोजीकल संग्रहालयाची स्थापना कलकत्ता येथे करण्यात आली .
मनोरंजनातून शिक्षण या मुख्य संकल्पनेतून संग्रहालयाची शिक्षणात भूमिका असते आणि ती राष्ट्रीय शिक्षणात हि असते आणि हि वर्गाध्यापणावर अवलंबून संग्रहालयाच्या या शैक्षणिक भूमिकेमुळे संग्रहालये हि अनौपचारिक शिक्षणाची केंद्रे बनली
आहेत
संग्रहालये हि परंपरेची आणि पारंपारिक संस्कृतीची सर्वसामान्य माहिती आणि नंतर योग्य व अचूक माहिती देतात
संग्रहालये संग्रहालयास भेट देणाऱ्यास संग्रहालयातील वस्तू दृष्टी क्षेपात ठेऊन दृष्टी संवाद घडवितात
सध्याच्या आधुनिक जगात संग्रहालये हि शैक्षणिक आणि अनुवंशिक संशोधकांना योग्य ती माहिती पुरवितात संग्रहालये हि दृष्टी अनुभव आणि माहितीची देवाण घेवाण करतात आणि हीच अनौपचारिक शिक्षण संपर्कात महत्वाची असते आणि हि शिक्षणात उपयोगी पडते
संग्रहालयात विविध मार्गांनी संग्रहालयास भेट देणार्यांना शिक्षण दिले जाते ते शिक्षण देताना सहल मार्गदर्शकासहित सहल ग्यालरी संभाषण सर्वात
चांगले असते तसेच हे संभाषण पर्यटक आणि शिक्षक यांच्या साठी चांगले असते
अस असल तरी संग्रहालयाने काळजी पूर्वक बनविलेले संग्रहालय साहित्य माहिती पत्रके हस्त पत्रके ग्यालरी शीट माहिती पुस्तके मार्गदर्शक पुस्तके चित्रे पोस्त कार्डे क्याटलॉग न्यूज लेटर संशोधन
मोनोग्राफ इत्यादी हेच पर्यटकांना कायम स्वरूपी माहिती देतात
वर्क
शोप सेमिनार यांचे आयोजन करून उच्च पातळीवरील संशोधनास प्रोस्चाहन दिले जाते संग्रहालयाचा ऑडीटोरीयम सारखा वापर करून विविध शैक्षणिक हेतू साध्य करण्यासाठी संग्रहालय अधिकारी ऑडीटोरीयम मध्ये फिल्म शो चे आयोजन करतात संग्रहालय आणि सांस्कृतिक संबधित कृती युक्त कला सादरी करणात कलाकार मग्न असतात साधारण पणे डान्स आणि ड्रामा याचा वापर करून पर्यटकना शिक्षित केले जाते अशा प्रकारच्या अनौपचारिक शिक्षणात वाद विवाद सजीव सादरीकरण कलाकारांच्या सहय्याने पर्यटकाना दिले
जाते सध्याच्या आधुनिक संग्रहालयातील ग्रंथालयात संदर्भ पुस्तके विविध वयासाठी लागणारी पुस्तके असतात
संग्रहालय दुकान संग्रहालयाच्या आवारात च असते या दुकानात फोटो ग्राफ प्लास्टर कास्ट व्हिदिओ क्यासेट सी डी रोम मोडेल्स तसेच इतर आर्टिकल योग्य किमतीत विकत मिळतात आणि त्या वस्तू वैश्विक असतात त्यामुळे पर्यटकाना वारंवार संग्रहालयास येण्यास भाग पाडतात आणि हे खूप परिणाम कारक असते
संग्रहालय आवारात संग्रहालय उपहारगृह असते आणि या उपहारगृह मध्ये पर्यटकाना चहा नष्टा जेवण अल्पशा किमतीत उपलब्ध असते तसेच याच उपहार गृहात संग्रहालय दिवस आठवडा पंधरवडा सांस्कृतिक कार्यक्रम प्रदर्शने सुद्धा भरविली जातात त्यामुळे लोक संग्रहालयाकडे मोठ्या प्रमाणात आकर्षिले जातात
संग्रहालय आणि शालेय शिक्षण –
सन १९९६ साली
संसदेन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मंजूर करून ते अमलात आणले या शैक्षणिक धोरणात संग्रहालयास भेट हि अभ्यासक्रमाचा अनिवार्य भाग करून विद्यार्थ्यांना संग्रहालयास भेट हि सक्तीची करण्याची शिफारस करण्यात आली होती .
विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष वस्तू पाहून त्याची माहिती घेतल्यास ती दीर्घ काळ स्मरणात राहते आणि हा शिक्षणाचा चांगला मार्ग होय आणि हे शिक्षण प्राथमिक स्तरावर होते असे मत १९९६ चे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे आहे
मुलांनी
संग्रहित केलेल्या वस्तूचे दगड पिसे पंख पाने इतर वस्तू यांचा संग्रह हा शालेय संग्रह निर्माण करून त्यात ठेवावा व वेळोवेळी त्याचे प्रदर्शन भरवावे .
माध्यमिक शिक्षण आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण –
विविध
शाळांच्या संपर्कातून संग्रहालयास भेट दिली जाते या भेटीत संग्रहालयाचे ग्रंथालय ग्यालरी राज्य व केंद्रीय पुरातत्व सर्वे यांनी निर्माण केलेली आणि अस्तित्वात आणलेली संग्रहालय कॉर्नर आणि त्याचे मोडेल्स यांचा समावेश असतो तसेच पोस्टर्स आर्ट पुस्तके वस्तू ह्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या भागातून किवा शेजार्यांच्या भागातून संग्रहित केलेल्या वस्तू उदा पाने फुले क्राफ्ट पिसे इत्यादी
विद्यापीठीय शिक्षण आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण
पेंटीग
ग्यालरी आर्ट फोटोग्राफी करिता सोय कोरीव काम इत्यादी करिता महाविद्यालयात खास जागा राखून ठेवणे महाविद्यालयाची संपर्क साखळी चा वापर
करून शेजारील महाविद्यालयाशी संपर्क साधून फिरते प्रदर्शन भरविले जाते तसेच सांस्कृतिक प्रदर्शन हे वेगळया खोलीत किवा ग्यालरीत भरविले जाते
प्राथमिक
स्तरापासून विद्यापीठ स्तरापर्यंत विविध स्तरावर संग्रहालय शिक्षण फायदेशीर आणि गुणकारी ठरणार असल्याचे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात वास्तव सत्य नमूद केले आहे
सर्व
साधारण पणे प्रत्येक संग्रहालयात संग्रहालय शिक्षण विभाग असतो त्याचे प्रमुख हे विशेष शिक्षक असतात संग्रहालय शिक्षण तज्ञ संग्रहालयातील विशेष शिक्षकांना शिक्षणाचे मानसशास्त्र तसेच पर्यटकाना यांना विविध संकल्पना अनुभव आणि गुंतागुंतीच्या संकल्पना व माहिती स्पष्ठ कशी करावी याचे प्रशिक्षण दिलेले असते
अस असल तरी संज्ञापना तील कला आणि विज्ञान हा प्रमुख प्रकार संग्रहालयात येणाऱ्या साठी आहे संग्रहालयाचे शिक्षण देणारे हे विविध अभ्यासक्रमाचे विविध संस्थातून अध्यापन शास्त्रा नुसार अध्यापन करीत असतात
शाळा आणि शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण -
संग्रहालय शिक्षण विभागाची स्थानिक पातळीवरील शालेय शिक्षक
शिक्षण प्रशिक्षण यांचेशी संपर्क ठेवण्याची आणि संग्रहालय शिक्षणात काय चालू आहे आणि सदरचे स्नग्र्हलायाचे शिक्षण कसे घ्यायचे याची माहिती देण्याची जबाबदारी हि संग्रहालय शिक्षण विभागाची असते
सन १९९२ मध्ये
रोबर्ट फ्रान्सलेलवर म्हणाले की संग्रहालय शिक्षक (गाईड) हे विद्यार्थ्यांना परिपूर्ण माहिती देऊ शकत नाहीत तर त्यांचे शिक्षक च त्यांना संग्रहालयाची माहिती देऊ शकतात कारण त्या शिक्षकांना त्यांच्या विद्यार्थ्यांची सर्वांगीण माहिती असते उदा शिक्षण घेण्याची क्षमता आणि त्यांना काय पाहिजे हे त्यांना माहित असते
म्हणून
शालेय शिक्षकांना शाळकरी मुलांना गाईड करण्याकरिता गाईड म्हणून कार्य करण्यासाठी लागणारे आवश्यक गुण अंगीकृत करण्यासाठी योग्य ते प्रशिक्षण घ्यावे लागते यात संग्रहालयातील वस्तूचे सखोल निरीक्षण कसे करावे त्याची आयकोनोग्राफी त्याचा वापर पदार्थ हेतू सामजिक संबध मिळविण्याची तंत्रे इत्यादी वर्षातून एकदा तरी संग्रहालयाने शालेय शिक्षकासाठी संग्रहाल शिक्षण कार्यक्रम घ्यावा
संग्रहालये हि संग्रहालय शिक्षकांना औपचारिक प्रशिक्षण आणि अप्रशिक्षित शिक्षकांना हि प्रशिक्षण देण्यास बांधील राहतात .
( सहल संग्रहालय भेट (
संग्रहालय शिक्षण विभागाच्या शिक्षक आणि कर्मचारी यांनी काळजी पूर्वक आणि नियोजन पूर्वक शालेय विद्यार्थ्याच्या भेटीचे नियोजन करावे
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात नमूद केल्या प्रमाणे शालेय विद्यार्थ्याची संग्रहालय भेट हि अभ्यास क्रमाचा एक भाग आणि शालेय शिक्षणाशी सांगड घालणारा असावा संग्रहालय भेटीची तयारी हि वर्गातच करून घ्यावी .
संग्रहालयाची ओळख व इतर हालचालीची माहिती विद्यार्थ्यांना वर्गातच द्यावी की ज्यायोगे मुले ज्यावेळी संग्रहालयात पोहचतील त्यावेळी त्यावेळी त्यांना आगोदरच संग्रहालयाची ओळख व इतर माहिती असलेने संग्रहालय आणि त्यातील इतर वस्तू पाहण्यासाठी सोपे जाईल आणि संग्रहालयातील वस्तूची फोटोग्राफी आणि चित्रांकन करणे सोपे जाईल
मुले
संग्रहालयात आल्यानंतर संग्रहालयाचे कर्मचारी आणि शिक्षक यांनी त्यांना मैत्री पूर्ण स्वागत करावे त्यानंतर संग्रहालय पाहण्याकरिता योग्य मार्गदर्शन करावे यात ग्यालरीज आणि मौल्यवान आर्ट क्राफ्ट याचाही समावेश असावा
प्रत्येक
संग्रहालयात शैक्षणिक खोली किवा शोध खोली असते या खोलीत सहल कार्यक्रमावर व्याख्यान दिले जाते उदा वर्कशॉप क्वीज शोज पपेट शोज फिल्म शोज डान्स ड्रामा डिबेट पेंटिंग स्पर्धा इत्यादींचा समावेश असतो
शाळा लोन सर्व्हिस –
संग्रहालयातील वस्तू ह्या शाळेसाठी उसन्या घेणे यालाच शाळा लोन सर्व्हिस असे म्हणतात संग्रहालयातील खर्या वस्तू ह्या लोन सर्व्हिस मधील मुख्य तत्व असते उदा किंग कनिश्का यांच्या काळातील कोप्रची कॉइन्स कोरीव काम केलेल्या वस्तू उदा बुद्ध यांच्या आधारे कमी वेळात शिक्षक माहिती देऊ शकतात नाहीतर अशा संग्रहालयातील वस्तू संग्रहालयाच्या कपाटातच राहतील आणि जर मुले आणि शिक्षक यांच्या हातात दिल्यास त्या वस्तूचा शैक्षणिक हेतू साध्य होईल वस्तू ह्या खास त्याच्या नोट्स सहित खास शिक्षकासाठी बनविण्यात आलेल्या असतात
आदर्श
लोन कित मध्ये संग्रहालयातील वस्तू टाकते नकाशे स्लाईड्स वर्कशिट्स ऑडीओ व्हिडीओ क्यासेट सी डी डी व्ही डी सूचना पुस्तिका ज्यामध्ये शिक्षकांनी मुलावरील सूचना लिहलेल्या असतात की ज्यामुळे शिक्षणासाठी नवीन ध्येय धोरण आखण्यासाठी सदरचे अनुभव आणि पुनरप्रत्याभरन माहिती उपयोगी पडते .
संग्रहालय कॉर्नर –
प्रत्येक
संग्रहालयाने त्याच्या प्रशासकीय भागातील शाळेस किमान एक संग्रहालय कॉर्नर उभे करण्यास प्रोस्चाहीत करावयाचे आहे आणि या करिता शाळेस संग्रहालयाने संपर्क ,इलेक्ट्रिशियन ,सुतार आणि इतर तांत्रिक मनुष्यबळ पुरवून संग्रहालय कॉर्नर उभे करण्याकरिता मोडेल फोटोग्राफ इत्यादी पुरविले जावे यालाच संग्रहालय शैक्षणिक सहभाग स्टयाटीग्री म्हणतात त्यास सध्या शिक्षणाचा चांगला मार्ग संबोधतात
- लेखक -
श्री आनंद मारुती लोखंडे (MSc, MEd , CCJ)
संपादक मालक प्रकाशक मुद्रक
साप्ताहिक आनंद लोखंडे वृत्त , मंथली विजयप्रताप
सिद्धेश्वर नगर भाग ५ प्लॉट नंबर २०६
मजरेवाडी पोस्ट टिकेकरवाडी सोलापूर ,
मोबा.९९६०२०७४५३
आणि vijaypratapmonthly@yahoo.in
Comments
Post a Comment